सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी... महागाई भत्त्याबाबत सरकारचा मोठा निर्णय

 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी... महागाई भत्त्याबाबत सरकारचा मोठा निर्णयनवी दिल्लीः दीड वर्षाहून अधिक काळ वाढलेल्या डीए आणि थकबाकीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 1 वर्षात तीनदा महागाई भत्त्याला (DA) ब्रेक लागला होता. परंतु आता 1 जुलैपासून सामान्य महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजेच आतापर्यंत केंद्रीय कर्मचार्‍यांना 17 टक्के मिळणारा महागाई भत्ता आता 11 टक्क्यांनी वाढून थेट 28 टक्के होणार आहे.

जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये चार टक्के वाढ करण्यात आली. यानंतर दुसऱ्या सहामाहीत (जून 2020) तीन टक्क्यांनी वाढ झाली. जानेवारी 2021 मध्ये यात चार टक्क्यांनी वाढ झाली होती. अशा प्रकारे कर्मचार्‍यांना डीए 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवून फायदा होणार आहे. मात्र, सरकारने गेल्या वर्षी जानेवारीपासून त्यावर बंदी घातली होती. आता दीड वर्षानंतर तिन्ही हप्त्यांवरील स्थगिती काढून टाकण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post