सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग, 'या' विभागातील अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय ६२ पर्यंत

 

सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय ६२ पर्यंतमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलीय. त्यात प्रामुख्याने आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे.


महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातंर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिका-यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे असणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देण्यासाठी निकष निश्चित करणार असल्याचं या बैठकीत ठरलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post