पांडुरंगासमोर खुर्चीवर नाही तर जमिनीवरच बसणार! मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा साधेपणा

 

पांडुरंगासमोर खुर्चीवर नाही तर जमिनीवरच बसणार! मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा साधेपणापंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी पंढरपुरात रश्मी ठाकरे यांच्यासह विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा केली. विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे गाभाऱ्यात पोहोचले. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसण्यास सांगितलं. नार्वेकरांपाठोपाठ पत्नी रश्मी ठाकरे यांनीही पतीला खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला. शेजारीच असणारी खुर्ची मिलिंद नार्वेकर यांनी बसण्यासाठी पुढे केली. त्यामुळे आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुर्चीवर बसले आणि महापूजेला सुरुवात झाली.


त्यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यटन मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे जमिनीवर बसले. मुख्यमंत्र्यांसोबत आलेला सुरक्षारक्षकांचा ताफाही जमिनीवरच बसला. 

“मी खाली बसतो, काही अडचण नाही. खुर्ची नको, ती बाजूला ठेवूयात. मागचे बाकीचे सर्वच जमिनीवर बसलेत मीही बसतो” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमिनीवर बसकण मारली. “हो साहेब बसू शकता” असं पुजारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना म्हणाले. त्यासोबत मुख्यमंत्री क्षणाचाही विलंब न लावता थेट जमिनीवर बसले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कृतीतून त्यांचा साधेपणा दिसून आल्याची चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post