दोन डोस पुरेसे नाहीत, तिसर्या बुस्टर डोसची गरज

 

दोन डोस पुरेसे नाहीत, तिसर्या बुस्टर डोसची गरजनवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन आरोग्य विभाग रणनीती तयार करत आहे. अशातच एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया  यांनी कोरोना लसीकरणाबाबत आणि कोरोनाच्या नव्या विषाणूंबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या नव्या विषाणूंवर मात करण्यासाठी बूस्टर डोसची गरज पडेल, असं मत डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, “भविष्यात कोरोनाच्या विषाणूचे आणखी व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला कोविड लसीकरणासोबतच बूस्टर डोसची व्यवस्था करण्याची गरज आहे.”


डॉ. गुलेरिया म्हणाले, “जसजसा वेळ पुढे जाईल तसतशी रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल. त्यामुळे नागरिकांना बूस्टर डोसची गरज लागेल. हा डोस भविष्यात येणाऱ्या नव्या कोरोना विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी उपयोगी पडेल. कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील लसींची रोगप्रतिकारक शक्ती अधिक असेल. या लसी आगामी काळात येणाऱ्या विषाणूंविरुद्ध लढण्यातही मदत करतील.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post