राजीनामे देणारे भाजपचे एकनिष्ठ नाहीत.... मुंडे समर्थक नाराजीवर प्रवक्त्यांनी मांडली भूमिकाराजीनामे देणारे भाजपचे एकनिष्ठ नाहीत.... मुंडे समर्थक नाराजीवर प्रवक्त्यांनी मांडली भूमिका सांगली : भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा न मिळाल्यानं मुंडे समर्थक चांगलेच नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. बीडमध्ये अनेक मुंडे समर्थकांनी भाजपच्या पदाचा राजीनामा देत आपली उघड नाराजी व्यक्त केलीय. यानंतर कुठलीही नाराजी नसल्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता या राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केलीय. भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्यानं राजीनामे देणारे भाजपचे एकनिष्ठ नसल्याचा आरोप केलाय. 

भाजप नेते गणेश हाके म्हणाले, “केंद्रीय मंत्रिमंडळाची जी पुनर्रचना झालीय त्यात प्रीतम मुंडे यांचा समावेश झाला नाही. त्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचं मी ऐकलंय. परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (9 जुलै) दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि अंतिमतः आपण असतो. हीच भारतीय जनता पक्षाची विचारसरणी आहे.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post