चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा गळा आवळून खून, ३ वर्षांची चिमुरडी झाली अनाथ

 चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा गळा आवळून खून, ३ वर्षांची चिमुरडी झाली अनाथभंडारा: पत्नीच्या संशय घेत तिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर पोलिस स्टेशन हद्दित राजेदहेगाव येथील सुयोगनगर येथे घडली आहे. यानंतर पतीने जवाहरनगर पोलिसांसमोर येऊन आत्मसमर्पण केल्याने संबधीत घटना उघड़ झाली आहे. स्नेहलता लंकेश्वर खांडेकर (वय 24 ) असे मृतकाचे नाव असून आरोपी पतिचे नाव लंकेश्वर खेमराज खांडेकर (वय 34) असून तो आर्डिनेंस फैक्ट्री भंडारा येथील कैंटीन मध्ये कुक पदावर कार्यरत आहे.

2015 ला गोंदिया येथील स्नेहलताचे भंडारा जिल्ह्याच्या नेहरवानी येथील लंकेश्वर याच्या सोबत शुभमंगल होऊन संसार सुरु झाला. गुण्या गोविंदाने संसार सुरु असतांना त्यांना एक चिमुकली ही झाली. मात्र कालांतराने लंकेश्वर याच्या स्वभावात बदल होऊ लागला व तो स्नेहलताच्या चारित्रावर संशय घेऊ लागला. यामुळे लंकेश्वर व मृतक स्नेहलताचे खटके उडु लागले. यात काल 1 च्या सुमारास लंकेश्वर व स्नेहलता यांत कड़ाक्याचे भांडण झाले. दरम्यान लंकेश्वरने ओढ़नीने स्नेहलताचा गळा आवळन्यास सुरुवात केली यात दम घुटुन स्नेहलताचा मृत्यु झाला. सकाळी लंकेश्वर यास आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला व सरळ जवाहर नगर पोलिस स्टेशन गाठत आत्मसमर्पण केले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post