नगर जिल्ह्यात खोदकाम करताना सापडला गुप्तधनाचा हंडा, प्रशासन झाले सक्रिय...


बेलापूर गावात खोदकाम करताना सापडलं गुप्तधन, प्रशासनाने पंचनामा करून घेतले ताब्यात नगर: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर   गावात घराचे खोदकाम सुरु असताना सापडलेल्या धनाच्या हंड्यात ११ किलो  चांदीची राणीच्या काळातील जुनी नाणी, शिक्के सापडली आहेत. सरकारी पंचासमक्ष तहसीलदारांनी पंचनामा करुन ताब्यात घेतले.

बेलापुरात एका जागेत खोदकाम सुरु असताना सदरचा धनाचा हंडा सापडला. तो हंडा घमालकाने ताब्यात घेतला होता. या गुप्तधनाचा बोभाटा संपूर्ण जिल्ह्यात झाला. या ठिकाणी चांदी असल्याची माहिती संबंधित जागा मालकाने जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. त्यानुसार काल तहसीलदार, सर्कल, तलाठी तसेच पोलीस यांच्यासह अधिकारी बेलापुरात दाखल झाले.


काल सकाळी हा हंडा ताब्यात घेतला. यात 11 किलो चांदीची 1046  शिक्के तसेच जुन्या राणीच्या काळातील नाणी, 1 रुपयाचे 915 शिक्के तसचे इतर चार आणे व आठआणेचे नाणी आढळून आले आहेत. अशी एकूण 11 किलो चांदी तहसीलदारांनी सरकारी पंचासमक्ष ताब्यात घेतले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post