उद्धव ठाकरे स्वतः सांगायचे फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील... भाजप नेत्याचा मोठा दावा

 


नगर: उद्धव ठाकरेच भाषण करत होते की भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, मग खंजीर कुणी खुपसला? तुम्ही का आडवे आले? इतिहास साक्षी आहे ज्यांनी असे खंजीर खुपसले त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. लपवाछपवीचा खेळ जास्त दिवस चालत नाही. 2024 ला पुर्ण बहुमताने भाजपाचे सरकार येईल' अशी घणाघाती टीका भाजपचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.


भारतीय जनता पार्टीच्या युवा वॉरियर्स या  मोहिमे अंतर्गत संघटन वाढवण्यासाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नगर जिल्हयाच्या दौऱ्यावर होते. २५ लाख युवकांना या मोहिमेत जोडणार असल्याचं बावनकुळे यांनी ‌संगमनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलंय. या वेळी बावनकुळे यांनी राज्य सरकारवर  हल्ला चढवला.

शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. निवडणुका आमच्या भरवशावर लढवल्या आणि त्यांच्या जागा आमच्या भरवश्यावर निवडून आणल्या. सरकार बनवताना मात्र 'मातोश्री'चे दरवाजे लावून घेतले. त्यांचे दरवाजे त्यांच्या मर्जीनेच उघडतात. शिवसेनेने काँग्रेस,  राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली. त्यांचे अगोदरच ठरलेलं होते. आम्ही इमानदारीने राहिलो त्यांनी मात्र खंजीर खुपसला, अशी टीका बावनकुळे यांनी सेनेवर केली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post