नगरसेविका पतीच्या खिशातील मोबाईलचा स्फोट

 नगरसेविका पतीच्या खिशातील मोबाईलचा स्फोट


प्रातिनिधिक छायाचित्र

नगर :श्रीगोंदा शहरातील नगरसेविका सीमाताई गोरे यांचे पती प्रशांत गोरे यांच्या पँटच्या खिशातील विव्हो कंपनीच्या मोबाईलचा  अचानक स्फोट झाला. यात गोरे यांच्या पायाला दोन ठिकाणी भाजले आहे. सुदैवाने यात गोरे यांना जास्त दुखापत झाली नाही.

     याबाबत माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रशांत गोरे हे पेडगाव रस्त्यावर एका व्यक्तीशी बोलत असताना अचानक त्यांच्या पँटच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल मॉडेल वाय७१ या मोबाईलचा अचानक स्फोट झाला.

त्यांनतर खिशातील मोबाईलने पेट घेतला. परंतु गोरे यांनी समयसूचकता दाखवल्यामुळे यात त्यांना जास्त दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे हा मोबाईल स्विच ऑफ होता.तरीसुद्धा त्याचा असा स्फोट झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post