नगर जिल्ह्यात पुन्हा हनीट्रॅप, २ लाखांची खंडणी मागितली, महिलेसह साथीदारांवर गुन्हा दाखल

 

नगर जिल्ह्यात पुन्हा हनीट्रॅप, दोन लाखांची खंडणी मागितली, महिलेसह साथीदारांवर गुन्हा दाखलनगर- अकोले तालुक्यातील एका व्यक्तीच्या शरीरसंबंधाचा व्हिडिओ बनवून ‘हनी ट्रॅप’ करण्याचा प्रकार समोर आला आहे.  बदनामीची धमकी देत त्याच्याकडून दोन लाखाची खंडणी मागण्यात आली. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या प्रतिष्ठिताने धाडसाने पुढे येत अकोले पोलिसांत तक्रार दिल्याने या महिलेचे बिंग फुटले. या गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. .

अकोले पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार गुन्ह्यातील आरोपी महिला व तिचा सहकारी यांनी दि. 11 जून 2021 ते दि.13जून 2021 रोजी तीन वाजता आरोपी महिला व तिच्या साथीदारांनी कटकारस्थान व संगनमत करुन या प्रतिष्ठित व्यक्तीला शरीरसंबधाचे अमिष दाखवून त्यांचेतील महिलेसोबत शरीरसंबध ठेवणेस भाग पाडले. त्याचा अश्‍लील व्हिडीओ बनवुन तो व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. या व्यक्तीने आरोपी यांना पैसे न दिल्याने आरोपींनी या व्यक्तीला मारहाण करुन व्हिडीओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी दिली. या व्यक्तीच्या ए.टी.एम मशीन मधून 30,000 रुपये बळजबरीने काढायला लावुन पैसे काढल्या नंतर ते बळजबरीने तक्रारदार यांचे कडुन घेवून अजुन 1,70,000 रुपयांची मागणी केली.


अकोले पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा.पो निरीक्षक मिथुन घुगे यांनी लागलीच सदर घटनेबाबत वरिष्ठांंना कळविले. तक्रारदाराकडे 10 हजार रुपये देऊन सुगाव फाटा येथे जावुन थांबण्यास सांगीतले व तेथे पोलिसांनी पंचासमक्ष सापळा लावुन एक महिला व एक पुरुष आरोपी यांना तक्रारदार यांचेकडुन 10 हजार रुपये खंडणी घेताना रंगेहाथ पकडले.या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post