केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार... अजितदादा म्हणाले...

 केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार... अजितदादा म्हणाले...पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना कुणाला घ्यावं आणि कुणाला थांबवावं हा त्यांचा अधिकार असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच यात आम्ही बाहेरच्यांनी लुडबूड करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलं. ते पुण्यात पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघूनच हे सर्व लोकं निवडून आलेत. भाजपचे जे खासदार निवडून आलेत ते मोदी पंतप्रधान होणार म्हणून देशातील जनतेने त्यांना निवडून दिले,” असंही त्यांनी नमूद केलं 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post