एका क्लिकवर डावूनलोड करा मतदार ओळखपत्र...रंगीत ओळखपत्रही उपलब्ध

 


नवी दिल्ली: मतदार ओळखपत्र हे आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जर आपले कार्डदेखील हरवले असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आपण हे कार्ड पुन्हा डाऊनलोड करू शकता. मतदानाशिवाय मतदार ओळखपत्र  हेसुद्धा अनेक सरकारी योजनांसाठी ओळखपत्र म्हणून वापरले जातो. याशिवाय याचा उपयोग सरकारी कामातही होऊ शकतो.


याप्रमाणे डिजिटल वोटर आयडी डाऊनलोड करा

>> डिजिटल वोटर आयडीसाठी voterportal.eci.gov.in वर नोंदणी करावी लागेल.

>> यानंतर तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (https://www.nvsp.in/account/login) वर लॉगिन करावे लागेल.

>> येथे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला EPIC क्रमांक किंवा फॉर्म क्रमांक द्यावा लागेल.

>> आता तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक ओटीपी येईल.

>> आपल्याला वेब पोर्टलवर ओटीपी टाकावा लागेल.

>> यानंतर तुम्हाला बर्‍याच वेबसाईटवर दिसतील, तुम्हाला डाऊनलोड ई-ईपीआयसीवर क्लिक करावे लागेल.

>> आता तुमचा डिजिटल मतदार आयडी पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड होईल.

याशिवाय तुम्ही रंगीबेरंगी आणि प्लास्टिक मतदार ओळखपत्रदेखील बनवू शकता. आपण घरी बसून या कार्डसाठी अर्ज करू शकता. ते आकारातही लहान असून त्याची छपाईची गुणवत्ताही चांगली आहे. हे कार्ड बनविण्यासाठी तुम्हाला फक्त 30 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय व्होटरआयडी संबंधित कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांकावर 1950 वर संपर्क साधू शकता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post