साडेसात लाखांची लाच, पीआय, एपीआय 'एसीबी'च्या जाळ्यात

 साडेसात लाखांची लाच, पीआय, एपीआय 'एसीबी'च्या जाळ्यातसोलापूर : साडेसात लाख रुपयांची लाच घेताना पीआय आणि एपीआय लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले. पोलीस निरीक्षक संपत पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांना सोलापुरात अटक करण्यात आली. मुरुम उपसा प्रकरणातील आरोपीकडे दोघा पोलिस अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. 

7 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना पीआय संपत पवार आणि एपीआय रोहन खंडागळे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले.

संपत पवार हे सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आहेत, तर रोहन खंडागळे तिथेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post