जिल्ह्याचा 'रिकव्हरी' रेट ९६ टक्क्याच्या पुढे , जिल्ह्यात २४ तासात' इतक्या'रुग्णांना डिस्चार्ज

 दिनांक १४ जुलै, २०२१

आज ४२० रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ५३८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६ टक्के



अहमदनगर: जिल्ह्यात आज ४२० रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७७ हजार ४१९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५३८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ९७५ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११७ आणि अँटीजेन चाचणीत ३४७ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, नगर ग्रा. ०४, नेवासा ०३, पारनेर १७, पाथर्डी १७, राहुरी ०२, संगमनेर १४, श्रीरामपूर ०१  आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९, अकोले ०२, जामखेड ०५, कोपरगाव ०१, नगर ग्रा.११, नेवासा ०१, पारनेर ११, पाथर्डी ०४, राहता १५,  राहुरी ०२, संगमनेर ३३, शेवगाव ०१, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ०३ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ३४७ जण बाधित आढळुन आले. मनपा ०४, अकोले २३, जामखेड ११, कर्जत ३९, कोपरगाव १०, नगर ग्रा. १०, नेवासा ०८, पारनेर ५०, पाथर्डी ५०, राहता ०२, राहुरी ०६, संगमनेर ६८, शेवगाव २२, श्रीगोंदा ४२, श्रीरामपूर ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०६, अकोले २८, जामखेड ४०, कर्जत २९, कोपरगाव १३, नगर ग्रा. २८, नेवासा २५, पारनेर ५९, पाथर्डी २९, राहता १५, राहुरी १८, संगमनेर ४३,  शेवगाव २०, श्रीगोंदा ४४, श्रीरामपूर १८ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:२,७७,४१९

उपचार सुरू असलेले रूग्ण:२९७५

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६००७

एकूण रूग्ण संख्या:२,८६,४०१

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post