खा.विखेंचा कामांचा धडाका...‘या’ तालुक्यातील 5 रस्ते प्रकल्पांसाठी 25 कोटींचा निधी

 पारनेर तालुक्यातील 5 रस्ते प्रकल्पांना  25 कोटी निधी मंजूर

 खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची माहितीनगर - देशासह महाराष्ट्रामध्ये  कोरोना महामारीच सामना करण्यासाठी  केंद्र सरकारने मोफत लसीकरण्याच्या उद्दिष्टाने 35 हजार कोटीची विशेष तरतूद केली आहे . करोना काळात रस्त्याची कामे पूर्ण होण्याबाबत केंद्र सरकार कटिबद्ध असून ग्रामीण भागांमध्ये दळणवळण  कडे दुर्लक्ष केले नाही  . पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत प्रत्येक तालुक्यातून आपण पाच रस्ते सुचविले होते.. पहिल्याच टप्प्यात पारनेर तालुक्यातील पाच रस्त्यांना मंजुरी मिळाली ह्याचा विशेष आनंद आहे . असे प्रतिसाद खासदार डॉ सुजय विखे पाटील ह्यांनी केले, ते आज पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी ते बोलत होते. 

पारनेर तालुक्यातील सुपा, बाबुर्डी, रांजणगाव, तळेगाव, पाडळी रांजणगाव, वडनेर हवेली, गटेवाडी, कान्हूर  पठार, कोकणवाडी, पिंपळगाव येथील गावांना भेट देऊन विविध विकास कामांचा शुभारंभ यावेळी खासदार डॉ विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी जि प उपाध्यक्ष सुजीत झावरे, प स सभापती गणेश शेळके, जि प सद्स्य जलसंधारण समिती चे राहुल शिंदे,भाजपचे तालुका अध्यक्ष वसंतराव चेडे, भाजपच्या महिला तालुका अश्विनी थोरात,भाजपचे युवक जिल्हा अध्यक्ष अमोल मैडं, सरपंच मनीषा रोकडे,उपसरपंच सागर मैड,प्रकाश गुंड,उपसरपंच सुजाता गवळी व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी खासदार डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांचा चेहरामोहरा बदलून  दळणवळणाच्या सुविधा सर्वांगीण विकास साधला जाईल. आपण प्रत्येक तालुक्यातील पाच कामे प्रस्तावित केली होती त्यापैकी एकट्या पारनेर तालुक्यातील पाच कामांना मंजुरी मिळाली, कामे लवकरच सुरु होतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पुढील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला असून यामध्ये सुपा ते अपधुप बाबुर्डी रस्ता, रांजणगाव ते उखगाव रस्ता, वाडेगव्हाण ते पाडळी  रांजणगाव, वडनेर हवेली ते गटेवाडी रस्ता, भोंद्रे ते कान्हार पठार रस्ता, काकनेवाडी ते पिंपळगाव तुर्क रस्ता इत्यादी कामांचा शुभारंभ करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post