बहुप्रतिक्षित ओला इलेक्ट्रिक स्कूटर भारतात, 499 रुपयांत बुकिंग

 बहुप्रतिक्षित ओला इलेक्ट्रिक स्कूटर भारतात, 499 रुपयांत बुकिंग नवी दिल्ली : ओला आपल्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक स्कूटरच्या लॉन्चिंगची तयारी करत आहे, जी येत्या काही आठवड्यात भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. कंपनीने आता नवीन स्कूटरचे अधिकृत बुकिंग सुरू केले आहे. इच्छुक ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर युनिट ऑनलाइन आरक्षित ठेवू शकतात.  लिकडेच ओलाचे प्रमुख भाविश अग्रवाल यांनी ओलाच्या आगामी स्कूटरची काही वैशिष्ट्यांचा खुलासा केला होता. कंपनीच्या ग्रुप सीईओने नुकतीच ट्विटरवर जाहीर केले की, स्कूटरमध्ये सर्वात मोठी बूट स्पेस, अ‍ॅप-आधारीत कीलेस एक्सेस आणि सेगमेंट-लीडिंग रेंज यासारख्या सुविधा असतील. स्कूटर बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त 499 रुपये खर्च करावे लागतील. मागील दाव्यांनुसार, ओलाची आगामी इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 18 मिनिटांत 50 टक्केपर्यंत चार्ज होईल. हा चार्जिंग वेळ 75 किलोमीटरची रेंज देण्यासाठी पुरेसा असेल तर स्कूटरची संपूर्ण चार्ज रेंज सुमारे 150 किमी असल्याचे सांगितले जाते. या दाव्यांना कोणताही आधार असल्यास स्कूटर अ‍ॅथर 450X आणि TVS iQube सह त्याच्या बर्‍याच प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अधिक रेंजला सपोर्ट करेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post