उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इतक्या क्विंटल साखर वाटप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इतक्या क्विंटल साखर वाटपजळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुरब्बी नेते आहेत. आपला आक्रमक स्वभाव आणि कामाच्या शैलीमुळे ते सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या याच स्वभावामुळे कार्यकर्ते त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात. जळगावातही अजित पवारांवर जीव ओवळणारा असाच एक कार्यकर्ता आहे. अरविंद बंगालसिंह चितोडिया असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. सध्या अरविंद चितोडिया चर्चेत आले आहेत, ते त्यांच्या एका उपक्रमामुळे. अजित पवारांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने अजित पवारांना जनतेचे आशीर्वाद मिळून त्यांना उदंड आयुष्य लाभावेत तसेच ते राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून अरविंद हे चक्क 30 क्विंटल साखर लोकांना घरोघरी जाऊन वाटत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post