अहमदनगर जि.प.सर्व्हन्टस को.ऑप.क्रेडीट सोसायटीस 6 कोटी 49 लाखांचा ढोबळ नफा : चेअरमन अरूण जोर्वेकर

 अहमदनगर जि.प.सर्व्हन्टस को.ऑप.क्रेडीट सोसायटीस 6 कोटी 49 लाखांचा ढोबळ नफा : चेअरमन अरूण जोर्वेकर

शनिवार दि.12 जून रोजी ऑनलाईन वार्षिक सभेचे आयोजनअहमदनगर : अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हंटस्‌ को.ऑप.क्रेडिट सोसायटीस सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये 6 कोटी  49 लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सोसायटीची 94 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने झूम ऍपव्दारे शनिवार दि.12 जून रोजी सकाळी 11 वाजता बोलविण्यात आली आहे. संस्थेच्या पदसिध्द अध्यक्षा तथा जि.प.अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सोसायटीच्या  संचालकांच्या उपस्थितीत संस्थेच्याच सभागृहात सभा होईल. यात सभासदांनी आहे त्या ठिकाणावरुन ऑनलाईन सहभाग नोंदवायचा आहे, अशी माहिती चेअरमन अरूण जोर्वेकर यांनी दिली.
कोविड महामारीचा प्रादुर्भाव मागील वर्षभरापासून कायम असून राज्यात शासनाने प्रत्यक्ष सभांचे आयोजन करण्यावर निर्बध लावले आहेत. यापार्श्वभूमीवर लाभांश व कायम निधी वरील व्याज लवकरात लवकर मिळावे अशी सभासदांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे सदर वार्षिक सभा ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आली आहे.
सोसायटीच्या आर्थिक कामगिरीची अधिक माहिती देताना चेअरमन जोर्वेकर यांनी सांगितले की, संस्थेचा सन 2020-21 चा वार्षिक अहवाल संस्थेच्या वेब साईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. संस्थेस मागील आर्थिक वर्षात 6 कोटी 49 लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. वेगवेगळ्या हेड खाली 75 लाख 56 हजार 230 रुपयांच्या आवश्यक तरतुदी तसेच कायम निधी वरील व्याजापोटी 2 लाख 98 लाख 71 हजार 583 रुपये वजा जाता अहवाल सालात संस्थेस   2 कोटी 75 लाख 10 हजार 318 रुपये निव्वळ नफा झालेला आहे. ऑनलईन वार्षिक सभेत संचालक मंडळाने सभासदांच्या दि. 31 मार्च 2020च्या शेअर्सवर  10टक्के लाभांशाची शिफारस केली असून कायम निधी वरील व्याज 9 टक्के करण्याचा विषय आहे. सभासदाची सर्वसाधारण कर्ज मर्यादा 13 लाखावरून 15 लाख, तातडी कर्ज मर्यादा 25 हजारवरून 30 हजार रुपये व सभासद कल्याण निधी वार्षिक हप्ता 500 करणे, श्री गणेश कुटुंब आधार योजना,प्रत्येक सभासदाची शेअर्स मर्यादा 2 लाख वरून 3 लाख करणे,  संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार पोटनियम मंजुरीस ठेवण्यात आले आहेत.
व्हाईस चेअरमन प्रताप गांगर्डे यांनी सांगितले की, मार्च 2020 अखेर सभासद संख्या 2931 असून संस्थेचे वसूल भाग भांडवल 21.93 कोटी,फंड्स 14.46 कोटी,ठेवी 114.70 कोटी,सभासदांना कर्ज वाटप 111.67 कोटी रुपये इतके आहे.  अहवाल सालात सभासद कल्याण निधी मधून 6 मयत सभासदांचे 30 लाख 26 हजार 200 रुपये कर्ज माफ करण्यात आलेले आहे. तसेच मयत सभासदांच्या वारसांना 5 हजार प्रमाणे एकूण 65 हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून तातडीची मदत देण्यात आलेली आहे. कन्यादान योजेने अंतर्गत 38 सभासदांच्या मुलींचे विवाहासाठी धनादेशाव्दारे प्रत्येकी 5 हजार रुपयेप्रमाणे एकूण 1 लाख 90 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. संस्थेने सभासदांची वार्षिक 5 लाखांची अपघात विमा पॉलीसी घेतलेली आहे. संस्थेने अहवाल वर्षात सभासदांना तातडी कर्ज ऑनलाईन सुरु केलेले असून दिनांक 12 जून 2021 रोजी मोबाईल ऍ़पचेही उदघाटन करणेत येणार आहे. मागील वर्षाप्रमाणे सभासदांचे डिव्हिडंड व व्याजाची रक्कम सभेच्या दुसर्‍या दिवशी सभासदांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याचे गांगर्डे यांनी सांगितले.
दि.31 मार्च 2021 अखेर 68 थकबाकीदार सभादांकडे 2 कोटी 84 लाख इतकी थकबाकी होती. वसुली बाबत संचालक मंडळाने कठोर भुमिका घेऊन थकबाकीदार सभासदांचे स्थावर मालमत्ता जप्तीबाबत कारवाई सुरु केल्याने 86 लाख थकबाकीची वसुली झालेली आहे.मागील दोन वर्षापासून सेवानिवृत्तीसाठी अनुदान नसल्याने सेवानिवृत्ती वेतन प्रस्ताव मंजुर होऊन देखील वसुल न आलेले सभासदांची 1 कोटी 37 लाख इतके येणे असुन आज अखेर 60 लाख 25 हजार निव्व्ळ थकबाकी दिसून येत आहे. ही थकबाकी वसुलीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विशेष गुणवत्ता प्राप्त सभासदांच्या मुला-मुलींना पारितोषिक वितरण तालुकानिहाय करण्यात येणार आहे, अशी माहिती  माजी चेअरमन श्रीमती इंदु गोडसे यांनी दिली. यावेळी संस्थेचे संचालक संजय कडूस, भरत घुगे, सोपान हरदास, संतोष नलगे, संजु चौधरी, अरुण शिरसाठ, विलास वाघ, ज्ञानदेव जवणे, हरी शेळके, मोहन जायभाये, वालचंद ढवळे, सुभाष कराळे, नारायण बोराडे, इंदु गोडसे, उषा देशमुख, अशोक काळापहाड, शशिकांत रासकर, विलास शेळके, कैलास डावरे, बाबासाहेब पंडित,शेषराव शेळके, व्यवस्थापक राजेंद्र पवार ,उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे, कर्मचारी वृंद उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post