वाळूंज येथे 100 चिंच वृक्षांची रोपांचे वाटप

 धनंजय व पृथ्वीराज फुलसौंदर यांनी तयार केलेल्या 100 रोपांचे वितरणपर्यावरणाचे महत्व लहानपणीच मुलांना समजले पाहिजे - संतोष म्हस्के     नगर - जागतिक पर्यावरण दिन हा सर्वत्र साजरा होत असतो, परंतु हा दिन व्हॅटस्अपवर साजरा न होता कृतीतून साजरा झाला पाहिजे. पर्यावरणाचे महत्व सर्वांनाच पटू लागले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्यांनी पुढाकार घेतला तर लहान मुलेही त्यांचेच अनुकरण करता ही बाब चि.धनंजय व चि.पृथ्वीराज यांनी तयार केलेल्या रोपांतून दिसून येत आहे. लहानपणापासून शिक्षणाबरोबर सामाजिकतेची जाणिव करुन देऊन पर्यावरणाचे महत्व समजावून सांगितले पाहिजे.  या उपक्रमांतून इतरही मुलांना प्रेरणा मिळणार असून, मिळालेल्या रोपांचे संवर्धन करण्याची जाबबदारी आम्ही घेऊ, असे प्रतिपादन बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के यांनी केले.


     जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत धनंजय व पृथ्वीराज विष्णू फुलसौंदर यांनी तयार केलेल्या 100 चिंच वृक्षांची रोपांचे नगर तालुक्यातील वाळूंज येथे वाटप केले. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के, विष्णू फुलसौंदर, ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब रोहकले, वाळूंजचे सरपंच सुखदेव दरेकर, बाळासाहेब दरेकर, रमेश दरेकर, भरत दरेकर, दादा दरेकर, बाळासाहेब बेरड, भाऊ काकडे, बाबा आंबेकर, योगेध दळवी, राजू म्हस्के, विकास म्हस्के आदि उपस्थित होते.


     नक्षत्र लॉनचे संचालक विष्णू फुलसौंदर यांची मुले चि.धनंजय व चि.पृथ्वीराज यांनी लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने वेळेचा सद्ुपयोग करुन घरासमोर असलेल्या चिंचेच्या झाडे बिया गोळा करुन त्यापासून रोपे तयार केली. तयार झालेली ही रोपे मामाच्या गावी लावण्याचा हट्ट धरला. त्यानुसार वाळूंज येथे ही रोपे नागरिकांना वाटप करण्यात आली. उपस्थितांनीही छोट्यांनी तयार केलेल्या या रोपांचे संवर्धन करण्याची ग्वाही देऊन चि.धनंजय व चि.पृथ्वीराज फुलसौंदर यांचे कौतुक केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post