ब्रेकिंग न्युज - नगर जिल्ह्यात वाळू माफिया कडुन ग्रामसेवकांवर हल्ला गुन्हा दाखल

ब्रेकिंग न्युज - नगर जिल्ह्यात वाळू माफिया कडुन  ग्रामसेवकांवर हल्ला गुन्हा दाखलशेवगाव-रविवारी सकाळी प्रभू वाडगाव येथे ग्रामसेविका संचिता दळवी यांना ग्रामपंचायतीच्या मालकीची शेतकी असलेल्या शासकीय जागेत दत्तात्रय जायभाय हा अवैध वाळू उपसा करत असल्याचे दिसले. त्यांनी त्याला विचारणा करुन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने शिवीगाळ दमदाटी करत त्यांना मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत त्यांचे मंगळसूत्र गहाळ झाले.


दळवी यांनी तात्काळ तहसीलदारांना फोनवरुन घटनेची माहिती दिली. तोवर जायभाय चोरीच्या वाळू व ट्रॅक्टरसह पळून गेला. गावातील काही प्रतिष्ठितांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण दळवी यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सायंकाळी उशिरा शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्यासह इतर कायदा कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post