अवैध दारू विक्रीवर छापा...पोलिसांची धडाकेबाज कारवाई...video

 विसापूर येथे अवैध दारू विक्रीवर छापा...बेलवंडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई...
 पोलीस अधिक्षक मनोज पाटील साहेब , अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अगरवाल साहेब , उप.विभा.पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हयात दारु , जुगार , मटका , करणारे इसमावर करवाई करणे बाबत विशेष मोहिम चालू असून सदर मोहिमेचे अनुषंगाने बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांनी आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडाकेबाज कारवाई ला सुरवात केली आहे.  विसापूर गावाचे शिवारात रेल्वे स्टेशन जवळ टपरी मध्ये व विसापूर सब स्टेशन जवळ मोठया प्रमाणात देशी विदेशी दारु साठा आहे. अशी माहिती मिळाल्याने पो.नि.संपतराव शिंदे , पोहेकॉ / हसन शेख , पोना / संतोष गोमसाळे , पोना / ज्ञानेश्वर पठारे , पोकॉ / गुंड , पोकॉ / सोनवणे मपोकों / अविंदा जाधव होम / सचिन काळाणे असे दोन पंचासह सरकारी वाहनाने जाऊन सदर टपरीच्या पाठीमागील शेड मध्ये अचानक ०३:०० वाजता रेड केली असताना हॉटेल मध्ये इसम नामे संजय गोपीचंद गजवाणी व दुस – या टपरी मध्ये विजय सुरेश शिंदे हे दोघे मिळून आल्याने लगेच त्यांना  ताब्यात घेतले व आजू बाजूच्या ठिकाणची झडती घेतली असता त्या ठिकाणी २०,३०० रुपये किंमतीची देशी विदेशी दारु मिळून आली. दोन पंचा समक्ष जागीच पंचनामा करुन सदरचा मुददेमाल पोलीस ठाण्यात जमा करुन पोकॉ / संपत मंजाबापू गुंड आणि पोना / ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांचे मार्गदर्शना खाली सफौ / बजरंग गवळी व पोहेकॉ / रावसाहेब शिंदे हे करीत आहे . 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post