आश्चर्य...लस घेतल्यानंतर अंगाला लोखंडी, स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्या...पहा व्हिडिओ

आश्चर्य...लस घेतल्यानंतर अंगाला लोखंडी, स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्या...पहा व्हिडिओ नाशिक- कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर नाशिक शहरातील सिडको भागातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चक्क लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचा अजब प्रकार घडला आहे. सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञदेखील गोंधळात पडले आहेत.


अरविंद सोनार यांनी ९ मार्च रोजी सपत्नीक कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर २ जून रोजी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे आता प्रतिपिंड तयार होणार अशी त्यांची भावना असताना भलताच प्रकार पुढे आला आहे. त्यांच्या मुलाने अशाच प्रकारे कोविशील्ड लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या अंगाला लोखंडी साहित्य चिकटल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीवर काल रात्री बघितले. हे पाहून त्यांनी सहज आपल्या आई वडिलांची चाचणी घेतली. तर आईला असे काही झाले नाही. मात्र वडिलांच्या अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचे लक्षात आले. 

video


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post