शिक्षक पत्नीस कोरोना ड्युटी का लावली?....नवऱ्याची मुख्याध्यापकाला मारहाण

 

 शिक्षक पत्नीस कोरोना ड्युटी का लावली?....नवऱ्याची मुख्याध्यापकाला मारहाणसोलापूर : शिक्षक पत्नीस कोरोना ड्युटी का लावली, असा प्रश्न विचारत मुख्याध्यापकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूरमधील सोशल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असिफ इक्बाल शेख यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण प्रकरणी सद्दाम जाकीर नाईकवाडी याच्याविरोधात सोलापूरच्या जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला कोव्हीडचा सर्वे करण्याचे काम दिल्याबद्दल नाईकवाडीचा मुख्याध्यापक शेख यांच्यावर राग होता. यातूनच नाईकवाडी यांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post