खा.विखे करोनाची लाट ओसरल्यावर राहुरीत आले, राज्यमंत्री तनपुरे यांचा पलटवार

खा.विखे करोनाची लाट ओसरल्यावर राहुरीत आले, राज्यमंत्री तनपुरे यांचा पलटवारकोरोनाच्या जीव घेणार्‍या घेणार्‍या संकट काळात खासदार डॉ. सुजय विखे यांनी काही कार्यकर्त्यांच्या बोलण्यावरून राहुरीत येऊन खोटे नाटे आरोप करणे हे मुळीच पटले नाही. राहुरीकरांनी मोठे मताधिक्य देऊनही खासदार विखे हे कोरोनाची भयावह लाट ओसरत असताना राहुरीत आले. किमान राहुरीत आले हे समाधान कारक असताना त्यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत दुर्देवी असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा उर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी झूम अ‍ॅपद्वारे पत्रकारांशी संवाद साधत खासदार डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या आरोपांबाबत उत्तरे दिली. यावेळी राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले की, राज्याला लस पुरवठा करण्याची जबाबदारी ही नक्कीच केंद्राची होती. केंद्र शासनानेच भारत बायोटेक व सिरम कंपनीची लस पाठविली. परंतु, केंद्राकडून किती प्रमाणात लस पुरवठा झाला. लोकसंख्या पाहता तुटपुंज्या प्रमाणात लस आरोग्य प्रशासनाला मिळत होती. त्यामुळे आरोग्य विभागावर संकट निर्माण झाले होते. शेकडोच्या प्रमाणात लस येत असताना हजारोच्या संख्येने नागरिक गर्दी करीत होते. अशावेळी लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी म्हणून नियोजन करणे माझे कर्तव्य होते. केंद्र व राज्याच्या निधीचे भांडण करण्यापेक्षा लोकांचे जीव वाचविण्याला महत्व होते. खासदार डॉ. सुजय विखे हे कोरोना लाट कमी झाल्यानंतर राहुरीत दाखल झाले. ते राहुरीत आल्याचे समाधान असले तरीही त्यांनी केलेले राजकारण हे संकट काळात न पटण्यासारखे असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. 

दरम्यान, देशामध्ये सर्वत्र लसीचा तुटवडा निर्माण झालेला आहे. आठवड्याभरात एकदा किंवा दोनदा लस उपलब्ध होते. खरे म्हणजे डॉ. विखे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय आरोग्य मंत्र्याची भेट घेऊन लसीचा निर्माण झालेल्या तुटवडा व आरोग्याबाबत निर्माण झालेल्या समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी चर्चा करणे गरजेचे होते. ते न करता केवळ राजकीय टिका टिप्पणी हे कोरोनाच्या संकट काळात खासदार विखे यांना शोभत नसल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post