वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची.....

वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, संजय राउत यांचे चंद्रकांत पाटलांना उत्तरनाशिक : वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांना उत्तर दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्याश आम्ही वाघाशी म्हणजेच शिवसेनेशी मैत्री करायला तयार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी नाशिकमध्ये ही प्रतिक्रिया दिली. संजय राऊत पक्षबांधणीच्या निमित्ताने पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं.

चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा संजय राऊत यांनी दिल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post