नगर शहरातील सराफ बाजार खुला करावा

 नगर शहरातील सराफ बाजार खुला करावा,  आ.जगताप यांना निवेदननगर : नगर शहरात करोना रूग्णसंख्या आटोक्यात आली असून शहरातील मुख्य बाजारपेठेप्रमाणेच सराफ बाजारही खुला करण्याची मागणी करण्यात आली आहे. सराफ सुवर्णकार व्यावसायिकांनी याबाबत आ.संग्राम जगताप यांची भेट घेवून निवेदन दिले. सराफबाजार तसेच बाजारपेठ बंद असल्याने व्यावसायिक, व्यापार्‍यांबरोबरच शासनाच्या महसूलावरही परिणाम होत आहे. सध्या लग्नसराईही चालू असून अनेकांना सोने खरेदी करताना अडचणी येत आहेत. प्रशासनाने नियमावली ठरवून देत दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, त्याचे तंतोतंत पालन केले जाईल, असे सराफ व्यावसायिकांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी श्यामशेठ देडगावकर, संजय चोपडा, सागर कायगांवकर, प्रमोद बुर्‍हाडे, अतुल बोरा आदी उपस्थित होते. सराफ बाजार सुरु करण्याची मागणी सुभाष मुथा, सुभाष कायगांवकर, निळकंठ देशमुख, विशाल बुर्‍हाडे, मुकुंद रत्नापूरकर, ईश्वर बोरा, प्रकाश लोळगे, रसिक कोठारी, अमोल देडगांवकर, अनिल पोखरणा आदींनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post