जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक हल्ला दाखल करून घेण्यास टाळाटाळ ?

 सामाजिक कार्यकर्ते RTI कार्यकर्ते श्री विशाल बलदवा यांच्यावर प्राणघातक हल्ला शेवगांव पोलिसांचा गुन्हे दाखल करून घेण्यास टाळाटाळ???शेवगांव- गेल्या काही दिवसांपासून माहिती अधिकार कार्यकर्ते विशाल बलदवा यांनी महसुल खात्यातील कथित कारभाराच्या विरोधात आंदोलन आणि माहिती अधिकारात काल विविध दैनिकातून आलेल्या बातम्यांचा राग मनात धरून तालुक्यातून अवैधरीत्या मुरुम या गौण खनिजाचे सर्रास उत्खनन सुरु असून हा उपसा करणा-या तस्करांनी वनविभाग, देवस्थान व शासकीय मालकीच्या जमिनीला लक्ष्य केल्याने याबाबत दैनिकामध्ये वृत्तप्रसिध्द झाले म्हणून शेवगाव येथील समाजिक कार्यकर्ते विशाल बलदवा यांना अवैध मुरूम वाहतुक करणा-यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागला असून त्यांनी याबाबत एका वरीष्ठ अधइका-यांसह इतर चार ते पाच जणांवर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली आहे. मात्र काल  रात्री उशीरा पर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. 

     याबाबत समजलेली माहिती अशी की, तालुक्यात अवैधरीत्या मुरुम या गौण खनिजाचे सर्रास उत्खनन सुरु असून हा उपसा करणा-या तस्करांनी वनविभाग, देवस्थान व शासकीय मालकीच्या जमिनीला लक्ष्य केल आहे. प्रशासनाचा अंकुश नसल्याने हजारो ब्रास मुरुमाचा रात्रंदिवस उपसा करुन नैसर्गिक साधन संपत्ती व पर्यावरणाचे अतोनात नुकसान केले झाले आहे. शिवाय शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विशाल बलदवा यांनी नगर व नाशिक येथे तक्रारी केल्या आहेत. तसेच अनेक वृत्तपत्रांत याबाबत वृत्त झळकले आहे. याचा राग धरून बलदवा यांना काल शनिवार ता.१२ रोजी सायंकाळी घरापासून शेजारी बोलावून मुरुम वाहतुक करणारांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत बलदवा यांच्या डोक्याला मार लागल्याने सहा टाके पडले तर हाताला जबर मार लागला आहे. याबाबत बलदवा यांनी महसुल विभागाच्या वरीष्ठ अधिका-यांच्या सांगण्यावरुन चार ते पाच तस्करांनी मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र महसुलच्या वरीष्ठ अधिका-यांचे नाव असल्याने रात्री उशीरापर्यंत कुठल्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post