खा. राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांना विद्यार्थी काँग्रेस कडून फेसशील्डचे मोफत वाटपप्रतिनिधी : कोरानाचे संकट अजून संपलेले नाही. या संकट काळामध्ये पोलिसांनी जनतेची केलेली सेवा ही कौतुकास पात्र आहे. याच सामाजिक जाणिवेतून नगर तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष सुजित जगताप यांच्या संकल्पनेतून युवक - विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक तथा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी पोलिस स्टेशनमधील पोलिसांना काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त फेसशील्डचे मोफत वाटप करण्यात आले. 


यावेळी सुजित जगताप यांच्यासह शहर क्रीडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विशाल घोलप, सरचिटणीस साहिल शेख, ऋतिक शिरवाळे, योगेश जयस्वाल, वैभव कांबळे, अजय घोलप तसेच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आठरे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 


यावेळी बोलताना सुजित जगताप म्हणाले की, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांनी कोरोना काळामध्ये विद्यार्थी काँग्रेसला कोरोना संकटाशी दोन हात करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. विद्यार्थी काँग्रेस ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जरी काम करत असली तरी देखील सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पोलिसांना मोफत फेसशील्डचे वाटप करत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केला आहे. 


भविष्यात देखील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्यास विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक हे मैदानात उतरत जनतेची सेवा करण्याचे काम पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून निश्चितपणे करतील अशी ग्वाही यावेळी  सुजित जगताप यांनी दिली. 


युवक - विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक किरणभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच विद्यार्थी काँग्रेसच्या स्वयंसेवकांना कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटे संदर्भात काँग्रेसच्या कोवीड सहाय्यता कक्ष तथा वॉर रूमच्या माध्यमातून प्रभावीपणे मदत करण्यासाठी प्रशिक्षित करण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जगताप यांनी दिली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post