विखेंचे विधानसभा सदस्यत्त्व रद्द करण्याची मागणी

छत्रपती शिवरायांचा पुतळा गोदामात बंदीस्त,

 विखेंचे विधानसभा सदस्यत्त्व रद्द करण्याची मागणी

 


राहता : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बगीचा सुशोभित करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचे राजकारण गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. यासाठी पुतळाही तयार करण्यात आला असून राजकीय स्वार्थापोटी हा पुतळा धान्य गोदामात बंदिस्त करून ठेवण्यात आला आहे. ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना असून त्यासाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली. वाघ म्हणाले, छत्रपतींचा पुतळा बसविण्यासाठी राहता नगरपालिकेकडून गार्डन व सुशोभिकरणाचे काम सुरु असून त्याबाबत प्रशासकीय स्तरावर त्या ठिकाणी बसविणे योग्य होईल. तरी सर्व शिवप्रेमी, रयतचे, बहुजनांचा भावनांचा जनाआदराणा विचार होऊन राष्ट्रपुरुषांच्या कार्यास सलाम करून सदरील पुतळा तात्काळ मुक्त करण्याचा संबंधित अधिकारी तहसिलदार जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात यावा. तसेच या प्रकरणी राजकीय हिता पोटी गैर हेतु ठेऊन महाराष्ट्रातीलच नव्हे तर तमाम भारत वासियांचे श्रद्धास्थान यांची विटंबना करणारे आमदार राधाकृष्ण विखे यांचे विधानसभा सदस्य पद रद्द करावे, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तातडीने कारवाई न केल्यास दिनांक १९ जुलै २०२१ रोजी राहाता येथे उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post