पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

 विविध मागण्यांसाठी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचा आंदोलनाचा इशारानगर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्याची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेने मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारला 10जून पर्यंत मुदत दिली असून यानंतरही प्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जारी करण्यात आले आहे. या आंदोलनात अहमदनगर जिल्हा पशुचिकित्सा व्यवसायी संघटना सहभागी होणार आहेत अशी माहिती अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर सोनावळे, सचिव डॉ.नितीन निर्मळ यांनी दिली.

निवेदनावर राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. ज्ञानेश्वर गांगुर्डे, कार्याध्यक्ष डॉ.संजय कढणे कोषाध्यक्ष डॉ.गंगाधर निमसे, उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब वाकचौरे, संघटक डॉ.दत्ता जठार, डॉ.संतोष साळुंके, डॉ.सुरेश घुले, डॉ. निकम यांच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व पशुधन  विकास अधिकारी गट अ सेवाप्रवेश नियम सुधारणा प्रक्रिया चालू आहे. सदरील पदांच्या अस्तित्वात असलेल्या सेवाप्रवेश नियमात पदवीका /प्रमाणपत्र धारक पशुवैदयकीयांसाठी  पदोन्नतीचा कोटा अस्तित्वात आहे. त्यामुळे या पदांचे सेवाप्रवेश नियम तयार करताना समितीत संघटनेला स्थान मिळावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 8जानेवारी 2021रोजी ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु काही कारणाने ही बैठक रद्द झाल्याने ही बैठक पुन्हा घेण्यात येईल असे सांगण्यात आले  होते. परंतु या संदर्भात आजपर्यंत बैठकीचे आयोजन करण्यात आले नाही. त्यानंतर मात्र सेवाप्रवेश नियमात सुधारण्यासाठी पशु संवर्धन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समित्तीच्या बैठकीचे इतिवृत्त निदर्शनास आले. त्यानुसार दोन्ही पदांच्या प्रस्तावित सेवाप्रवेश नियमातील पदविका प्रमाणपत्र धारकांसाठी असलेला पदोन्नतीचा  कोटा पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. तसेच पशुधन विकास अधिकारी पदाच्या सुधारित सेवाप्रवेश नियमात पदवीका प्रमाणपत्र धारकांसाठी असलेल्या 15%कोटा रद्द करून औरंगाबाद खंडपीठाच्या निरीक्षणाचा आधार देत 5%कोटा पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील पदवीधरासाठी शिफारस करण्यात आला आहे.

ही बाब अनपेक्षित पक्षपात करणारी तसेच अतिशय गंभीर व संतापजनक असून खात्यातील फक्त पदवीधर पशुवैद्यकांचे हित जोपसणारी असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिती स्तरावरील या पदनामात बदल करून तालुका पशुसंवर्धन अधिकारी गट - अ करण्याचा घाट घालण्यात आला आहे्‌ ही पदे आतांत्रिक असल्याने राज्यातील 357 तालुकास्तरावरील पशुधन  विकास अधिकारी (विस्तार )ही पदे पशुधन विकास अधिकारी गट ब साठी स्थान निश्चिती केलेली आहेत. परंतु सदर स्थान निश्चित्ती महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशु वैद्यकीय संघटनेने केलेल्या विरोधामुळे स्थगिती देण्यात आली आहे.ही स्थगीती उठवावी आणि सध्या अस्तित्वात असलेल्या सेवा प्रवेश नियमानुसार पशुधन पर्यवेक्षक सहा. पशुधन विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी सहाय्यक आयुक्त अशी पदोन्नती मिळाळी तसेच 1984 च्या कायद्यात दुरुस्ती करावी. वेतनातुन कायमस्वरूपी प्रवासभत्ता मिळावा यासह सुमारे 11 मागण्या करण्यात आल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post