पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’‘, करोनामुक्त गाव स्पर्धेवर गोपीचंड पडळकर बरसले

‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’  करोनामुक्त गाव स्पर्धेवर गोपीचंड पडळकर बरसले मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे. ‘सगळं गावच करील तर सरकार काय करील? ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला असताना, त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी त्यांच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा कशी सुचतेय असा सवाल पडळकरांनी केला आहे. यावेळी पडळकरांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  यांना थेट टार्गेट केलं. गोपीचंद पडळकर म्हणाले, “आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोव्हिड आणि लॅाकडाऊनमुळे पूर्णपणे मोडला आहे. घरातील कित्येक कर्ती माणसं मृत्यूमुखी पडलीत. यांचे अश्रू पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचतेय”. ‘सगळं गावच करील तर सरकार काय करील?‘ हाच प्रश्न मला या कामचुकार मंत्र्यांबद्दल पडला आहे. नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्देशाने ही करोनामुक्तीची स्पर्धा आणली आहे, असं पडळकर म्हणाले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post