मी भारतात पाय ठेवताच करोना गायब होईल, फरार नित्यानंदचा दावा

मी भारतात पाय ठेवताच करोना गायब होईल, फरार नित्यानंदचा दावा एकीकडे भारत कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेसोबत लढत आहे आणि दुसरीकडे स्वंयघोषीत फरार साधू नित्यानंदने कोरोनावरून स्वत:बाबत हास्यास्पद दावा केला आहे. नित्यानंदने दावा केला की, जसा तो भारतीय जमिनीवर पाउल ठेवेल, कोरोनाचा अंता होईल. दरम्यान याआधी जेव्हा कोरोनाची दुसरी लाट खूप वाढली होती तेव्हा त्याने त्याच्या आयलॅंड कैलासावर भारतीयांची एन्ट्री बंद केली होती. 


रेपचा आरोपी फरार बाबा नित्यानंद व्हिडीओत आपल्या एका शिष्याला म्हणताना दिसला की, जसा तो भाारतात पाउल ठेवणार कोरोना व्हायरस देश सोडून पळून जाईल. २०१९ मध्ये भारतातून पळून गेल्यावर नित्यानंदने एक आयलॅंड खरेदी केलं आणि त्याचं नाव कैलाशा असं ठेवलं. नित्यानंदवर रेपचा आरोप असून इंटरपोल त्याचा शोध घेत आहे. नित्यानंदवर गुजरातमध्ये लहान मुलाचं अपहरण करून त्यांना आपल्या आश्रमात ठेवल्याचा आरोप आहे. सोबतच त्याच्यावर रेप आणि लैंगिक त्रासाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातही त्याच्यावर रेप आणि किडनॅपिंगचा गुन्हा दाखल आहे. तसेच फसवणूक आणि पैशांची हेरफेर केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post