धारदार शस्त्राने पत्नीवर वार,पतीने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या

धारदार शस्त्राने पत्नीवर वार,पतीने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या



 नांदेड :  कौटुंबिक वादातून दारुड्या पतीने पत्नीचा धारधार शस्त्राने खून करुन स्वतः शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरंगल येथे घडली. सदर प्रकरणी मुलाच्या फिर्यादीवरुन मयत वडिलांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नायगाव हे तालुक्याचं गाव तिथून 15 कि.मी अंतरावर असलेल्या नरंगल येथे शुक्रवारी सकाळी पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने पंचक्रोशीत चांगलीच खळबळ उडाली. सदरच्या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक रामराव पडवळ व उपनिरीक्षक बाचावार हे फौजफाट्यासह नरंगल येथे पोहचले. त्यांनी घटनेची सगळी स्थिती जाणून घेतली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post