डॉ.प्रितम मुंडेंना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची चर्चा

 डॉ.प्रितम मुंडेंना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची चर्चामुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक केली. दरम्यान या फेरबदलात बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंढे यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर तसंच नरेंद्र तोमर यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांवर दोन ते तीन मंत्रालयांची जबाबदारी आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या फेरबदलात या मंत्र्यांवरील ताण कमी करण्यासाठी नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आठवड्याभरात हा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात ई-सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्यातून डॉ. प्रीतम मुंढे यांचंही नाव आघाडीवर आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post