नवनीत कौर राणा यांची खासदारकी धोक्यात...

नवनीत कौर राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द, कोर्टाचा निकाल मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना मोठा धक्का बसला आहे. राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. न्यायमूर्ती बिश्त आणि धनुका यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. राणा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ उच्च न्यायालयात गेले होते. अडसूळांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post