2 कोटींची जमीन 18 कोटींना घेतली, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप

2 कोटींची जमीन 18 कोटींना घेतली, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोपलखनऊ-  आम आदमी पार्टीचे  राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी अयोध्येत राम मंदिराचं निर्माण करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच त्यांनी सीबीआय आणि ईडीकडून याप्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. रविवारी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत सिंह यांनी आरोप केला, की ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने 2 कोटी किंमत असणारी जमीन 18 कोटी रुपयांना खरेदी केली. हे सरळ भ्रष्टाचाराचं प्रकरण असून सरकारने याची चौकशी सीबीआय आणि ईडीमार्फत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चंपत राय यावर प्रतिक्रिया देत म्हणाले, की अशा प्रकारच्या आरोपांना ते घाबरत नाहीत. ते स्वत: वर झालेल्या आरोपांचा अभ्यास करतील. माध्यमांना प्रसिद्ध केलेल्या संक्षिप्त निवेदनात राय म्हणाले, "आमच्यावर महात्मा गांधींची हत्या केल्याचा आरोपही करण्यात आला. आम्हाला आरोपांची भीती वाटत नाही. मी या आरोपांचा अभ्यास करुन चौकशी करीन.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post