नातेवाईकांना देण्यासाठी चक्क लसच चोरली....आरोग्य कर्मचार्‍याचा प्रताप

आता लसीचीही चोरी...आरोग्य कर्मचार्‍याचा प्रताप उघडकीस


 

बीड : नगर जिल्ह्यातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकांना देण्यासाठी चक्क आरोग्य केंद्रातील लस चोरून आणल्याचे समोर आले आहे. आष्टी तालुक्यातील कडा आरोग्य केंद्रात लस देताना हा प्रकार उघड झाला. आता या आरोग्य कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकाराने मात्र लसींचा काळाबाजार कसा होतो, हे उघड झाले आहे.


विठ्ठल खेडकर हा आरोग्य कर्मचारी  नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चापडगाव आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. शनिवारी त्याने लसीची एक कुपी चोरून कडा आरोग्य केंद्रात आला. येथे आपल्या सहा नातेवाईकांना लस देण्यास सांगितले. परंतु हा प्रकार गंभीर असल्याने कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना सांगितला. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांना हा प्रकार सांगितला. यावर त्यांनी तत्काळ या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post