सिव्हिल हॉस्पिटल ने वॉक इन लसीकरण ची व्यवस्था सुरु करावे.

 आयुक्त साहेब धन्यवाद वॉक इन लसीकरण सुरु केल्या बद्दल 

सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा आता  सिव्हिल हॉस्पिटल ने वॉक इन लसीकरण ची व्यवस्था सुरु करावे.


नगर -  परदेशी जाणाऱ्या विदयार्थ्यांसाठी वॉक इन लसीकरण ची व्यवस्था मुंबई महानगरपालिकेने ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जायचे आहे त्यांना वॉक इन लसीकरण ची व्यवस्था केली त्याच धर्तीवर अहमदनगर येथे सुरु करावी अशी मागणी दिनांक 31/05/21 रोजी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. आयुक्त व मा. आरोग्याधिकारी यांच्या कडे केली होती त्या अनुशंगाने काल दिनांक 8/6/21 रोजी मा. आयुक्त यांनी आदेश करून सदरचे लसीकरण तोफखाना आरोग्य केंद्रा मध्ये उपलब्ध केल्याचे कळविले ही अभिनंदनिय बाब असून याच धर्तीवर मा. जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर यांनी सुरु करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली.

सध्या अहमदनगर शहरात असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जायचे आहे परंतु प्रशासनाने वय वर्षे 21 ते 45 असलेल्या नागरिकांना लसीकरण बंद केले असल्यामुळे त्यांना लसीकरण उपलब्ध होत नव्हते व लसीकरण  घेतल्या शिवाय सदर विद्यार्थी व नागरिक यांना परदेशात जाण्यासाठी परवानगी मिळत नव्हती परंतु ही अडचण आता दूर झाल्याने सदर विदयार्थ्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर लसीकरण ची व्यवस्था सावेडी केंद्रावर उपलब्ध करून दिल्यास उपनगरातील विदयार्थी व नागरिकांना शहरात जाण्याची गरज भासणार नाही यासाठी मा. आयुक्त साहेबांनी ही सावेडी उपकेंद्रात सुरु करावी अशीही सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post