तुम्हाला 2024 च्या निवडणुकीत दिल्लीला जायला आवडेल का? मुलीच्या प्रश्नावर आ.लंके म्हणाले...

 तुम्हाला 2024 च्या निवडणुकीत दिल्लीला जायला आवडेल का? मुलीच्या प्रश्नावर आ.लंके म्हणाले...नगर (सचिन कलमदाणे):  आ.निलेश लंके यांनी भाळवणीत उभारलेल्या शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरात कोविड बाधित लहान मुलांवरही उपचार सुरु आहेत. याठिकाणी आ.लंके यांनी नुकताच मुलांशी दिलखुलास संवाद साधत मुलांच्या मनातील अनेक प्रश्नांना थेट उत्तर दिले. मुलांनीही आ.लंके यांना बिनधास्त प्रश्न विचारले. तुमचे आवडत गाणं कोणतं, तुमचा आवडता पिक्चर कोणता असे अनेक प्रश्न मुलांनी विचारले व त्याला आ.लंके यांनी उत्तरे दिली. नायक चित्रपट आपला सर्वात आवडता असल्याचे त्यांनी सांगितले.

याचदरम्यान एका मुलीने आ.लंके यांना विचारले की, तुम्हाला 2024 च्या निवडणुकीत दिल्लीला खासदार म्हणून जायला आवडेल की मुंबईलाच आमदार म्हणून जायला आवडेल. त्यावर आ.लंके यांनीही थेट उत्तर दिले. मी दिल्लीला गेलो आणि इकडे माझ्या लोकांना काही अडचण आली तर दिल्लीहून यायला खूप वेळ लागेल. विमान शोधा, तिकीट बुक करा, विमानतळावरुन परत गाडीने इकडे या..अशा गोष्टीत खूप वेळ जातो. त्यापेक्षा मुंबईलाच राहिलो तर दीड दोन तासात मी माझ्या लोकांच्या मदतीला येवू शकतो, असे उत्तर देत आ.लंके यांनी उपस्थितांची मनं जिंकली. आ.लंके यांच्या सोशल मीडिया पेजवर हा संवाद कार्यक्रम पोस्ट करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post