बीज प्रक्रियेत खत वापराबाबत कृषी विभागाचे शेतकर्‍यांना महत्त्वपूर्ण आवाहन

 बीज प्रक्रियेत जिवाणू खताचा वापर करावा

कृषि विभागाचे शेतक-यांना आवाहननगरजैविक किड नियंत्रण प्रयोगशाळाअहमदनगर येथे जिवाणे संघ उपलब्‍ध आहे. यामध्‍ये रायझोबियमतुरमुगउडीदसोयाबीन इत्‍यादी पिकांसाठी व अॅझोटोबॅक्‍टर बाजरीकापुस इत्‍यादी पिकांसाठी जिवाणे खते जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळाअहमदनगर येथे उपलब्‍ध आहे. एकदल व तृणधान्‍य (उदा. बाजरीभातकपाशी) या खरीप हंगामातील पिकास उपयोगी असलेले अॅझोटोबॅक्‍टर जिवाणूखत तसेच शंगवर्गीय व व्दिदल पिकासाठी उपयोगी असलेले रायझोबियम या दोन खतापासुन वातावरणातील नत्र स्थिर करुन पिकांना उपलब्‍ध होते.

 बिजप्रक्रियेसाठी शेतक-यांनी जिवाणुसंवर्धन खताचा वापर करावा असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारीअहमदनगर यांच्‍याकडुन करण्‍यात येत आहे.

 बीज प्रक्रियेसाठी दहा किलो बियाणे स्‍वच्‍छ फरशीवरप्‍लास्‍टीक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवुन त्‍यावर शंभर मिलीलिटर जैविक खताचे मिश्रण असलेले द्रवण शिंपडुन हलक्‍या हाताने बियायण्‍यास चोळवावे. वाळलेले त्‍वरीत पेरावे. जैविक जीवाणू खत वापरण्‍यापुर्वी जर बियाण्‍यास किटकनाशकेबुरशीनाशके इत्‍यादी लावलेले असतील तर जिवाणूसंवर्धन मिसळु नये. प्रत्‍येक पिकासाठी वेगवेगळे जीवाणे खते वापरल्‍यास पीक उत्‍पादनात सात ते दहा टक्‍के वाढ तर होतेच शिवाय जमितीची सुपिकताही वाढत असल्‍याचे जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेचे तंत्र अधिकारी आर.आर.भोसले यांनी सांगितले आहे.

याचे फायदे जिवाणेखते हवेतील नत्र तसेच जमिनीमध्‍ये उपलब्‍ध स्‍वरुपात नसलेल्‍या नत्रस्‍फुरद व पालाश यांचे पिकांना उपलब्‍ध होईल अशा स्‍वरुपात निर्मिती करुन पिकांना ही अन्‍नद्रव्‍यांचा पुरवठा करुन देतात. त्‍यामुळे रासायनीक खताची मोठ्या प्रमाणत बचत होते.   

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post