भारतासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन प्रेरणादायी- आ.संग्राम जगताप

 

भारतासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन प्रेरणादायी- आ.संग्राम जगताप

राज्याभिषेक दिनानिमित्त बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुपी पुतळ्याचा दुधाने राज्याभिषेक करून पुष्पहार अर्पण करताना आ.संग्राम जगतापअहमदनगर प्रतिनिधी-श्री शिवछत्रपतींनी सहा जून १६७४ रोजी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून देशाच्या गौरवशाली संस्कृतीचे खऱ्या अर्थाने रक्षण केले.राज्याभिषेक झाला आणि महाराष्ट्रात  हिंदवी स्वराज्याची अधिकृतपणे घोषणा केली 'हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा' या एकाच ध्यासाने संपूर्ण जीवन व्यापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण घटणा आहे. 
म्हणून आजही हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केल्या जातो.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना असून खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा येणाऱ्या हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी असाच गौरवपूर्ण क्षण आहे.असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
     छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुपी पुतळ्याचा दुधाने राज्याभिषेक करून पुष्पहार अर्पण करताना आ.संग्राम जगताप यावेळी समवेत नगरसेवक गणेश भोसले ,मा.नगरसेवक संजय चोपडा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहरजिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे,युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष ढाकणे,पै.ओंकार घोलप,अनिकेत चव्हाण,निल कांबळे ,अनिकेत लोंढे,मोसीन सय्यद ,मळू गडाळकर, सागर गुंजाळ,सनी कर्पे,कृष्णा भागनगरे,शुभम कोमाकुल,ओंकार लोंढे,सागर आहेर,ऋषी कुसकर,सुशांत राठोड,शुभम घोलप,सनि बहिरवाडे,भैय्या भागाणगरे,अक्षय पवार,मयूर तिवारी आदी उपस्थित होते.
 
 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post