धक्कादायक...मुलानेच आपल्या आई वडिलांना अमानुष मारहाण

 धक्कादायक...मुलानेच आपल्या आई वडिलांना अमानुष मारहाण


अहमदनगर- शेजारील बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, मनोरुग्ण असणाऱ्या एका मुलानेच आपल्या आई वडिलांना अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ  समोर आला आहे.

मानसिक रुग्ण असलेल्या मुलाने काठी आणि दगडाने वयोवृद्ध पालकांना अमानुष मारहाण केली. दुर्दै


व म्हणजे वृद्ध दाम्पत्य मदतीसाठी याचना करत होते पण त्यांना वाचवण्याऐवजी गावातील रहिवासी मारहाणीचा व्हिडीओ काढण्यात दंग होते.

आई शिवबाई खेडकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचा मुलगा हा मनोरुग्ण असल्याचं सांगण्यात येत आहे.रात्री त्यांना अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते.  मात्र, आईचा मृत्यू झाला आणि वडील कोमात गेले आहेत. 

दरम्यान ग्रामस्थ मदतीऐवजी व्हिडीओ काढत बसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. हा मुलगा मनोरुग्ण असल्या करणाने कुणी पूढे जाण्याची हिम्मत केली नाही.


 दरम्यान, बाबासाहेब खेडकर हा चक्क काठीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना सतत मारहाण करत होता, असं काही ग्रामस्थांनी सांगितलं. त्याला मारहाण करताना थांबवण्यासाठी गेलेल्या लोकांना देखील शिव्या आणि मारहाण करत होता म्हणून लोकं तिकडे जात नव्हते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post