आ.निलेश लंकेच्या कोविड सेंटरला नगर तालुक्यातील इतक्या लाखांची मदत

 आ.निलेश लंकेच्या कोविड सेंटरला सारोळा ग्रामस्थांची 'लाख'मोलाची मदत


नगर - नगर - पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता.पारनेर) येथे उभारलेल्या ११०० बेडच्या  शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर (कोविड सेंटर) साठी सारोळा कासार (ता.नगर) येथील ग्रामस्थांनी १ लाख ५ हजार ५५५ रुपयांचा मदत निधी जमा करून दिला आहे. या मदतीचा धनाकर्ष (डी.डी.) नुकताच आ.लंके यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला.

कोरोना संकटाच्या काळात गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळावेत या हेतूने आ. निलेश लंके यांनी भाळवणी येथे १ हजार १०० बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. आ.लंके हे दिवसरात्र येथेच थांबून आहेत. येथील रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांबरोबर बाधित रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणे, त्यांच्या शरीराचे तापमान मोजणे, त्यांच्याशी चर्चा करून काय त्रास होत आहे हे जाणून घेणे. यातून तुम्हाला नक्की बरं करणार ही आत्मविश्वासाची भावना त्यांच्या मनात बळकट करणे, ही कामे स्वतः आ. लंके करीत आहेत. त्यामुळे रुग्णांमध्येही सकारात्मकता निर्माण होत आहेत. त्यातून त्यांना कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यास बळ मिळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत. 

आ. लंकेच्या या कार्याला अनेकांनी मदतीचा हात दिलेला आहे. सारोळा कासार ग्रामस्थांनीही स्वयंस्फूर्तीने या कामासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला व २ दिवसांत १ लाख ५ हजार ५५५ रुपयांचा मदत निधी जमा केला.सदर मदत भाळवणी येथे जावून आ.लंके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी शिक्षकनेते संजय धामणे, उपसरपंच जयप्रकाश पाटील, सोसायटीचे चेअरमन संजय काळे, दुध संघाचे संचालक राजाराम धामणे, गोराभाऊ काळे,बाळासाहेब धामणे, ग्रामपंचायत सदस्य गजानन पुंड, सुनिल हारदे, महेश धामणे, बाळासाहेब कडूस, शहाजान तांबोळी, मच्छिंद्र धामणे, गणेश काळे,सचिन कडूस, महेश रोडे आदी उपस्थित होते.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post