पाथर्डी शहरात विनाकारण फिरून गर्दी करणाऱ्यावर कारवाई

  पाथर्डी शहरात विनाकारण फिरून गर्दी फिरणाऱ्यांवर कारवाई
पाथर्डी :अनलॉक नंतर पाथर्डी शहरातील बाजार पेठेतील दुकानासह रस्तावर विनाकारण फिरून गर्दी करणाऱ्या लोकांवर तालुका प्रशासन कारवाई करायला आज बुधवार ( दि ९ )पासून सुरु केले आहे. प्रांताधिकारी देवदत्त केकाण,तहसिलदार शाम वाडकर ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे,मुख्याधिकारी धंनजय कोळेकर यांनी मुख्य बाजार पेठेत दुकानात विना मास्क असणारे ,विनाकारण गर्दी,दुचाकीवरून हिरोगिरी करत फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे.शासनाने अनलॉकचा निर्णय घेतांना ठरवलेले निर्बंध स्तर हे साप्ताहीकी पॉझीटीव्हीटीरेट व ऑक्सीजन बेडची एकून उपलब्धता यावर आधारीत घेतलेला आहे.त्यामुळे कोरोना संपला आहे असे नाही.बुधवारी सकाळी  शहरातील वसंतराव नाईक चौक,अजंठा चौक,क्रांतीचौक ,नवीपेठ ,शेवगाव रोड आणि जुन्या  बस्थानाक परिसरात प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पायी फिरून दुकानदारांना गर्दी होणार नाही,दुकानात असलेल्या ग्राहकांनी व मालकाने मास्कचा वापर करून सामाजिक अंतर ठेऊन सँनिटयझरचा वापर करण्याच्या सक्तीच्या सूचना केल्या आहेत.ज्या दुकानात कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही अश्या दुकान मालक ,रस्तावर विनाकारण मास्क न लावता फिरणाऱ्या लोकांना दंड वसूल केला आहे.शेवगारोड वरील स्टेट बँकेच्या एटीएम मशीन आणि बँकेत लोकांची गर्दी पाहून प्रांत अधिकारी देवदत्त केकाण,तहसिलदार शाम वाडकआवाक झाले.त्याठिकाणची लोकांची गर्दी त्वरित हटवण्यात आली.बँकेच्या बाहेर मंडप उभा करून येणाऱ्या ग्राहकांना खुर्चीवर बसवून सामाजिक अंतर ठेऊन कामकाज करण्याच्या सक्त सूचना तहसीलदार यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.सोमवार पासून जिल्हयाचे निबर्ंंध संपुर्णपणे हटवण्याचा प्रयत्न करुन जनजिवन सुरळीत केले आहे.जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संपुर्ण अनलॉक केला आहे.तेव्हा पासून कोरोना संसर्गाचे भान सर्वच मंडळी विसरून सर्रासपणे रस्तावर आली आहे.परिणामी मोठ्या प्रमाणावर सर्वच जागी गर्दी होत आहे. पंधरा ते वीस लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सोमनाथ गर्जे,अंबादास साठे,रवींद्र बर्डे ,राजेंद्र बालवे,पांडुरंग सोनटक्के,नंदलाल गोला,सरदार शेख,पंकज पगारे आदी पालिका कर्मचारी मोहिमेत सहभागी होते.  


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post