आम्ही कधीही तयार आहोत दोस्ती करायला आमची दुश्मनी कधीच नव्हती

आम्ही कधीही तयार आहोत दोस्ती करायला  आमची दुश्मनी कधीच नव्हती पुणे : “वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच”, असं स्पष्ट आणि थेट विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी केलं. ते पुण्यात बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत झालेली बंद दाराआढ बैठकीनंतर, चंद्रकांत पाटलांच्या या विधानाला महत्तवं आहे. 


चंद्रकांत पाटील म्हणाले, “आमची वाघाशी दोस्ती आहेच. उद्धव ठाकरे म्हणातात त्यांचं मोदीजींशी जमतं, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी जमतं नाही. का ते माहीत नाही. पण वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत”.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post