धक्कादायक... नगर जिल्ह्यात नराधम पित्याने केला मुलीवर अत्याचार

 एमआयडीसी परिसरात मजुरीचे काम करणार्‍या पित्याने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी विरोधात बलात्कारासह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहेबुधवारी (दि.16) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. परप्रांतातून एमआयडीसी परिसरात कामासाठी आलेल्या व्यक्तीने राहत्या घरी स्वतःच्याच 12 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पतीच्या या कृत्याची माहिती पत्नीला मिळाल्यानंतर तिने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी विरोधात बलात्काराचा तसेच पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे हे अधिक तपास करत आहेत.


दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 25 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सपोनि आठरे यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post