मा.आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश कोपरगाव बाजार समितीत कांदा मार्केट सुरू !माजी सभापती सुनिल देवकर यांनी मानले आभार

 मा.आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश कोपरगाव बाजार समितीत कांदा मार्केट सुरू !माजी सभापती सुनिल देवकर यांनी मानले आभार  माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश आले असुन आज कोपरगाव बाजार समितीचे कांदा मार्केट सुरू झाले आहे त्याबद्दल माजी सभापती सुनील देवकर यांनी मा.आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार मानले आहे.

 कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाचा वतीने लॉक डाऊन लावण्यात आला होता त्यामध्ये बाजार समित्यांचेही सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले होते,परंतु आता पावसाळा तोंडावर आला असुन काही ठिकाणी बिगरमोसमी पावसाने हि हजेरी लावली आहे या पाश्र्वभुमीवर शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बि- बियाणे,खते खरेदी करणे तसेच शेतीची मशागत करण्यासाठी आपल्याकडे असलेला कांदा व इतर शेतीमाल विकावा लागणार आहे.परंतु बाजार समितीचे कामकाज बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.परंतु माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजुन घेऊन पुढाकार घेत मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे बाजार समित्यांना कडक लॉक डाऊनमधुन वगळावे अशी मागणी करत पाठपुरावा केला व मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी तशी परवानगी दिली आहे.

 त्या अनुषंगाने आज कोपरगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू झाल्या मुळेशेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असुन शेतकर्‍यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे मा.जिल्हाधिकारी साहेब,मा.तहसीलदार साहेब मार्केट समितीचे संपूर्ण प्रशासन यांचे आभार मानले आहे.

या प्रसंगी प्रगतशिल शेतकरी व  माजी सभापती सुनील भाऊ देवकर माजी पंचायत समिती सदस्य उत्तमराव चरमळ नाटेगाव चे सरपंच विकास मोरे अशोक देवकर कैलास सोमासे बापू देवकर अनुराग येवले शरद सांगळे दादा दहे कैलास धट बाबा दहे राजेंद्र चांडे जालु शिंदे अजय भिंगारे विनोद परदेशी मनोज तुपे बाबासाहेब पानगव्हाणे रणजीत महाले तुकाराम गव्हाणे किशोर दरेकर प्रविण भोसले आणि किरण साळवे तसेच सर्व शेतकरी आणि मार्केट समितीचे अधिकारी व्यापारी उपस्थित होते.

 रोज सकाळी 7 ते 11या वेळेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोशल डिस्टिंगशनचे नियम पाळून कांदा लिलाव सुरू झाला असुन शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी घेऊन यावा तसेच प्रशासनाने बाजार समिती अधिकारी,कर्मचारी,व्यापारी, हमाल,व मजुरांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस द्यावी अशी मागणी माजी सभापती सुनिल देवकर यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post