मुख्यमंत्री म्हणतात...फक्त दोन औषधांनी मी करोनामुक्त झालो

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणतात...फक्त दोन औषधांनी मी करोनामुक्त झालो, मिडिया लोकांमध्ये भिती पसरवत आहे   तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मीडियावर गंभीर आरोप केला आहे. मीडिया कोरोनाबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे असा आरोप केला आहे. तसेच आपण फक्त पॅरासिटामॉल आणि अँटिबायोटिक औषधं खाऊन बरे झालो असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.के. चंद्रशेखर राव  यांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. फक्त दोन औषधांच्या सेवनाने ते आठवड्याभरात कोरोनातून बरे झाले असा दावा त्यांनी केला आहे  वारंगल येथील्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. "माहीत नाही कोण ब्लॅक फंगस, यलो फंगस अशा आजारांबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. कोणती वाहिनी आहे की कोणता पेपर आहे माहीत नाही. फंगस जिवंत आहे की निर्जीव पण लोक या गोष्टी ऐकून मरत आहेत. मी सांगतो, या टीव्हीवाल्यांना शाप लागेल" असं चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post