नगर जिल्हा पुन्हा हादरला ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार

 नगर जिल्हा पुन्हा हादरला ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार

बऱ्हाणपूरच्या ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबारनेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य संकेत भानुदास चव्हाण यांच्यावर काल रात्री साडेनऊच्या सुमारास गोळीबार झाला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, चव्हाण हे कांगोणी फाट्यावरून बऱ्हाणपूर रोडने रात्री साडेनऊच्या दरम्यान आपल्या घरी येत असताना एका ठिकाणी लघुशंकेसाठी थांबले असता मोटारसायकलवरून आलेल्या इसमांनी  गावठी कट्टयातून संकेत याच्यावर गोळीबार करून त्यांना जखमी केले. त्यांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले आहे . चांदयातील घटनेला पंधरा दिवस उलटत नाही तोच बऱ्हाणपूर येथे झालेल्या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


सदर घटनेची माहिती मिळताच शेवगाव उपविभागीय अधिकारी सुर्दशन मुंढे, शिंगणापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागूल तातडीने घटनास्थळी हजर झाले असून पुढील तपास चालु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post