करोना काळात नगर तालुक्यातील 'या' सेवा सोसायटीची शंभर टक्के वसुली

 चास सोसायटीची वसुली शंभर टक्के नगर- कोरोनाचा काळ असतानाही चास येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने दरवर्षा प्रमाणे या वर्षाही  शंभर टक्के वसुली जमा करत वसुलीची परांपरा कायम ठेवली . वसुलीचे उद्दीष्टे पुर्ण केले .  संस्थेने जवळपास साडेसात कोटी रूपयाची वसुली केली आहे . संस्थेमार्फत शेतकऱ्यासाठी सहकार्य केले जाते . या परीसरातील शेतकरी नवे जुने प्रकरण वेळेत जमा करतात या मुळे यामुळे या संस्थेचा कारभार पारदर्शक राहिला आहे . संस्था नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्याचे संस्थेचे चेअरमन डॉ.पांडुरंग देवकर यांनी सांगीतले .या वसुलीच्या  कामासाठी संस्थेचे चेअरमन डॉ.पांडुरंग देवकर , व्हा. चेअरमन डॉ. सुभाष गवळी , सर्व संचालक यांच्या प्रयत्नाने याच प्रमाणे संस्थेचे सचिव आर. एम. खुंटाळे कर्मचारी अब्बास शेख भास्कर बोरकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्याच बरोबर चास शाखेचे शाखाधिकारी भाऊसाहेब साळे व इतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. शंभर टक्के वसुली केल्याबदल तालुका विकास अधिकारी आनंदा शेळके यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post